GOVERNMENT OF INDIA

मन की बात @100 – क्विझ/ वर्णन

Start Date : 3 Apr 2023, 6:00 pm
End Date : 25 Apr 2023, 11:45 pm
Closed
Quiz Closed

About Quiz

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दर महिन्याला होणाऱ्या मन की बातया रेडीओ कार्यक्रमाने रेडीओच्या माध्यमाला नवीन जीवनदान दिले आहे.

लोकांच्या सहभागावर आधारित संकल्पना असणारा आणि कार्यान्वित होणारा, मन की बात हा कार्यक्रम देशातील लाखो लोकांच्या मनापर्यंत पोहोचला आहे आणि एप्रिल 2023 मध्ये याचे 100 भाग पूर्ण होणार आहेत.

मन की बात चा 100 वा भाग साजरा करण्यासाठी, प्रसार भारती (माहिती आणि प्रसारण मंत्रालय) मायगव्ह इंडिया सोबत एका प्रश्नमंजुषेचे आयोजन करणार आहे.

प्रश्नमंजुषेमध्ये भाग घ्या, तुमची प्रेरणा शेअर करा आणि जिंका

 

बक्षीसपहिल्या 25 विजेत्यांपैकी प्रत्येकाला 4000 रुपये बक्षीस म्हणून दिले जातील.

सहभागी होण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2023 आहे.

Terms and Conditions

1. प्रश्नमंजुषा इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेत खेळता येऊ शकेल.

2. सहभागींना केवळ एकदाच खेळण्याची परवानगी आहे; एकापेक्षा अधिक वेळा भाग घेण्याची परवानगी नाही.

3. सहभागींनी “प्रश्नमंजुषा सुरू करा” बटणावर क्लिक केल्यावर प्रश्नमंजुषा सुरू होईल. 

4. सहभागींकडे कठीण प्रश्न तात्पुरता सोडून पुढे जाण्याचा आणि नंतर पुन्हा त्या प्रश्नावर येण्याचा पर्याय आहे.

5. प्रश्नमंजुषेसाठी जास्तीत जास्त 150 सेकंदांचा अवधी आहे. 

6. प्रश्नमंजुषा वेळेवर आधारित आहे आणि म्हणून जेवढ्या लवकर सहभागी ही प्रश्नमंजुषा पूर्ण करतील तेवढी त्यांची जिंकण्याची शक्यता वाढेल. 

7. या प्रश्नमंजुषेत नकारात्मक गुण दिले जाणार नाहीत. 

8. जर अनेक सहभागींनी समान संख्येची अचूक उत्तरे दिली असल्यास ज्या सह्भागीने सर्वात कमी वेळ घेतला आहे त्याला विजेता घोषित केले जाईल. 

9. प्रश्नमंजुषा पूर्ण करत असताना, सहभागींनी पेज रिफ्रेश करू नये आणि त्यांची प्रवेशिका नोंदवण्यासाठी हे पेज सबमिट केले पाहिजे.

10.ही प्रश्नमंजुषा सर्व भारतीय नागरिकांसाठी आणि भारतीय मूळ असलेल्या सर्व लोकांसाठी खुली आहे. 

11. सहभागींना त्यांचे नाव, ई-मेल अॅड्रेस, मोबाइल नंबर और शहर इत्यादी माहिती प्रदान करावी लागेल. हे तपशील प्रदान करून, सहभागी या प्रश्नमंजुषेच्या उद्देशाने ही माहिती वापरण्यासाठी परवानगी देतात.

12.प्रश्नमंजुषेत भाग घेण्यासाठी एक मोबाइल नंबर आणि ईमेल अॅड्रेस केवळ एकदाच वापरला जाऊ शकतो.

13. MyGov कोणत्याही गैरव्यवहार किंवा अयोग्य वर्तनासाठी कोणत्याही वापरकर्त्याचा सहभाग अयोग्य घोषित करण्याचा अधिकार राखतो.

14. MyGov प्रश्नमंजुषा आणि / किंवा नियम आणि अटी / तांत्रिक मानक / मूल्यांकन मानक यांच्या सर्व किंवा कोणत्याही भागाला रद्द करण्याचा किंवा त्यामध्ये सुधारणा करण्याचा हक्क राखून ठेवते. तथापि, नियम आणि अटी / तांत्रिक मानक / मूल्यांकन मानक यामध्ये केलेला कोणताही बदल किंवा स्पर्धा रद्द करणे या संबंधी सूचना प्लॅटफॉर्म/मायगव्ह वर अपडेट / पोस्ट केल्या जातील.