GOVERNMENT OF INDIA

जल जीवन मिशन महाक्विज़ (Dadra and Nagar Haveli & Daman and Diu, Marathi)

Start Date : 1 Jul 2022, 2:00 pm
End Date : 31 Jul 2022, 11:30 pm
Closed
Quiz Closed

About Quiz

सबका विकास महाक्विज मालिकेतील चौथे क्विझ, ज्याची थीम आहे जल जीवन मिशन

 

भारताच्या  स्वातंत्र्याला ७५  वर्षे पूर्ण होत असताना, आझादी का अमृत महोत्सव, माय गव्ह सबका विकास महाक्विज मालिकेतील चौथ्या क्विझची ओळख करून देत आहोत , जो नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. विविध योजना आणि उपक्रम आणि फायदे कसे मिळवायचे याबद्दल सहभागींना संवेदनशील बनविणे हे या क्विझचे उद्दीष्ट आहे. या संदर्भात, माय गव्ह आपल्या सर्वांना सहभागी होण्यासाठी आणि नवीन भारताबद्दलच्या आपल्या ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी आमंत्रित करते. 

परिचय 

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार, आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या आदर्शांसाठी कटिबद्ध आहे. समाजातील गरीब आणि सीमांत घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी विविध कार्यक्रम आणि योजनांच्या माध्यमातून देशातील सर्व नागरिकांना आवश्यक त्या गोष्टी सुनिश्चित करण्यासाठी सरकार काम करत आहे. पिरॅमिडच्या तळाशी असलेल्या शेवटच्या व्यक्तीची सेवा करणे हे त्यांचे उद्दीष्ट आहे. गेल्या आठ वर्षांत, समाजातील सर्वात गरीब घटकांना शेवटच्या मैलापर्यंत पोहोचविण्यासाठी एक वेगाने झेप घेतली गेली आहे. घर बांधणे (पीएम आवास योजना), दिलेली पाण्याची जोडणी (जल जीवन मिशन), बँक खाती (जनधन), शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण (पीएम किसान) असो किंवा मोफत गॅस कनेक्शन (उज्ज्वला) असो, गरिबांच्या उपजीविकेत जाणवण्याइतपत सुधारणा झाली आहे.

जल जीवन मिशन ही मालिकेतील चौथ्या क्विझची थीम आहे  

चौथे क्विझ जल जीवन मिशन (जेजेएम) वर असेल. 15 ऑगस्ट 2019 रोजी घोषित केलेले, जल जीवन मिशन (जेजेएम) 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरात नियमित आणि दीर्घकालीन आधारावर पुरेशा दाबाने विहित गुणवत्तेच्या पुरेशा प्रमाणात नळाच्या पाण्याच्या पुरवठ्याची तरतूद करण्यासाठी राज्यांच्या भागीदारीत राबविण्यात येत आहे.

जल जीवन मिशनच्या घोषणेच्या वेळी, एकूण 18.93 कोटी ग्रामीण कुटुंबांपैकी फक्त 3.23 कोटी (17%) कुटुंबांकडे नळ जोडणी असल्याची नोंद करण्यात आली. अशाप्रकारे, उर्वरित 15.70 कोटी कुटुंबे त्यांच्या घराबाहेरील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतातून पाणी आणत होती ज्यामुळे या कुटुंबांचे जीवन मूलभूत गरजांपासून वंचित होते.

जेजेएम सुरु झाल्यापासून अडीच वर्षांपेक्षा कमी कालावधीत, जेजेएम अंतर्गत 6.4 कोटी नवीन जोडण्या प्रदान केल्या गेल्या आहेत ज्या, देशातील एकूण ग्रामीण कुटुंबांपैकी 50% पेक्षा जास्त कुटुंबाना व्याप्त करण्यासाठी सुवाह्य नळपाणी पुरवठ्याची संपूर्ण व्याप्ती घेतात.  

लाभार्थी या योजनेचा लाभ कसे घेऊ शकतात?

सर्व ग्रामीण कुटुंबे आपोआप या कार्यक्रमाच्या अंतर्गत येतात. जेजेएमबॉटमअपदृष्टिकोनाचा अवलंब करते आणि तिला विकेंद्रित, मागणीचालित, समुदायव्यवस्थापित पाणीपुरवठा प्रणाली म्हणून अंमलात आणली जात आहे

ग्रामपंचायती आणि/किंवा त्यांच्या उपसमिती खेड्यातील प्रत्येक घराला पाणीपुरवठा व्यवस्थापित करू शकतात, चालवू शकतात आणि देखरेख करू शकतात. समितीमध्ये किमान 50% महिला सदस्य आहेत आणि समाजातील दुर्बल घटकांना योग्य प्रतिनिधित्व आहे

मी (गैरलाभार्थी) लाभार्थ्याला योजनेचा लाभ घेण्यासाठी कशी मदत करू शकतो?

एक गैरलाभार्थी लाभार्थ्याला कार्यक्रमाबद्दल जागरूक करण्यात आणि कार्यक्रमात सहभागी होण्यास प्रवृत्त करण्यात मदत करू शकतो, कारण हा एकलोक कार्यक्रमआहे.

या योजनेसाठी एखाद्याला अधिक माहिती कशी मिळवता येईल?

मोबाईल अ‍ॅप (केवळ अँड्रॉइड)

https://play.google.com/store/apps/details?id=com.dhwaniris.jjm 

https://play.google.com/store/apps/details?id=com.dhwaniris.jjm 

वेबसाईट

https://jaljeevanmission.gov.in/ 

https://jaljeevanmission.gov.in/

जेजेएम डॅशबोर्ड

https://ejalshakti.gov.in/jjmreport/JJMIndia.aspx

https://ejalshakti.gov.in/jjmreport/JJMIndia.aspx

 

 

Terms and Conditions

1. ही क्विझ सबका विकास महाक्विझ मालिकेचा एक भाग आहे ज्यामध्ये विविध थीमवर वेगवेगळ्या क्विझेज सुरू केल्या जातील

2. हे कोडे 1st July 2022 रोजी प्रारंभ केली जाईल आणि 31 July 2022, रात्री ११:३० वाजेपर्यंत थेट प्रसारणामध्ये चालु राहील (IST)

3. सर्व भारतीय नागरिकांसाठी क्विझमध्ये प्रवेश खुला आहे.

4. हे कालमर्यादेत असलेले कोडे आहे ज्यामध्ये 200 सेकंदांमध्ये 10 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत | ही एक राज्य विशिष्ट क्विझ आहे जी एकाधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. एक व्यक्ती एकाधिक क्विझमध्ये भाग घेऊ शकते| 

5. हे कोडे 12 भाषांमध्ये उपलब्ध असेलइंग्लिश, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ आणि तेलगू

6. प्रत्येक क्विझमध्ये जास्तीत जास्त ,००० टॉप स्कोअरिंग सहभागींची विजेते म्हणून निवड केली जाईल. निवड झालेल्या प्रत्येक विजेत्याला 2,000/- रुपये दिले जातील.

7. विजेत्यांची निवड दिलेल्या अचूक उत्तरांच्या सर्वात जास्त संख्येच्या आधारावर केली जाईल. जर, अव्वल स्कोर करणाऱ्या सहभागींची संख्या 1,000 पेक्षा जास्त असेल तर उरलेल्या विजेत्यांची निवड कोडे पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेच्या आधारावर केली जाईल.

उदाहरण देऊन स्पष्ट करण्यासाठी, कोड्याचे निकाल खालीलप्रमाणे असल्यास – 

सहभागींची संख्या

गुणसंख्या

स्थिती

500

20 वर 20

त्यांना विजेते घोषित केले जाईल. 2000 रुपये मिळतील

400

19 वर 20

त्यांना विजेते घोषित केले जाईल. 2000 रुपये मिळतील

400

18 वर 20

ज्याअर्थी एकूण विजेते 1000 ला ओलांडत असल्याने केवळ 100 जणं पुरस्काराच्या रकमेसाठी पात्र असतील. त्यानुसार, कमीतकमी वेळ घेतला त्या आधारे 100 जणांची निवड केली जाईल. या 100 जणांना 2000 रुपये प्राप्त होतील.

8. एक सहभागी एका विशेष कोड्यामध्ये फक्त एकदाच जिंकण्यासाठी पात्र असेल. एकाच कोड्यादरम्यान एकाच प्रवेशकर्त्याकडून अनेक प्रवेश नोंदी त्यांना अनेकदा जिंकण्यासाठी पात्र ठरणार नाहीत. तथापि, सहभागी महाविकास क्विझ मालिकेच्या वेगळ्या कोड्यामध्ये जिंकण्यासाठी पात्र आहे

9. तुम्ही तुमचे नांव, इमेल पत्ता, टेलिफोन नंबर आणि पोस्टाचा पत्ता देणे आवश्यक असेल. तुमचे संपर्क तपशील देऊन, कोड्याच्या उद्देशासाठी आणि जाहिरात सामग्री मिळवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या या तपशीलांना तुम्ही संमती द्याल.

10. बक्षीसाच्या पैशांचे वितरण करण्यासाठी घोषित केलेल्या विजेत्यांनी त्यांचे बँक तपशील देणे आवश्यक असेल. बक्षीसाच्या पैशांचे वितरण केले जाण्यासाठी वापरकर्त्याचे नांव बँक खात्यावरील नांवासह जुळत असले पाहिजे.

11. प्रश्न स्वयंचलित प्रक्रियेद्वारे प्रश्न बँकेतून यादृच्छिकपणे निवडले जातील

12. तुम्ही एखादा अवघड प्रश्न सोडून देऊ शकता आणि नंतर काही काळाने त्या प्रश्नावर पुन्हा येऊ शकता.

13. यामध्ये कोणतेही नकारात्मक गुण नसतील.

14. कोडे त्या वेळेस ताबडतोब सुरू होईल जेव्हा सहभागी स्टार्ट क्विझ बटनावर क्लिक करेल

15. एकदा प्रवेश घेतल्यावर तो काढून घेतला जाऊ शकत नाही

16. जर असे उघडकीस आले की अवाजवी वेळेत कोडे पूर्ण करण्यासाठी सहभागीने अनुचित मार्गाचा वापरला आहे, तर प्रवेश नाकारला जाऊ शकतो

17. आयोजक अशा प्रवेशांसाठी कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नाहीत जे हरवले आहेत, उशीरा मिळाले आहेत किंवा अपूर्ण आहेत किंवा कॉम्प्युटरमधील त्रुटीमुळे किंवा आयोजकाच्या वाजवी नियंत्रणाबाहेरील कोणत्याही इतर त्रुटीमुळे प्रसारित झालेले नाहीत. कृपया लक्षात घ्या की प्रवेश दाखल करण्याचा पुरावा म्हणजे प्रवेश प्राप्त झाल्याचा पुरावा नाही.

18. कोणत्याही अनपेक्षित परिस्थिती उदभवल्याच्या बाबतीत, आयोजक क्विझमध्ये कोणत्याही वेळी सुधारणा करण्याचा किंवा क्विझ मागे घेण्याचा हक्क राखून ठेवत आहेत. यामध्ये कोणतीही शंका टाळण्यासाठी या अटी  शर्तींमध्ये सुधारणा करण्याचा हक्क समाविष्ट आहे

19. सहभागींना क्विझमध्ये सहभाग घेण्याचे सर्व नियम आणि नियमनांचे वेळोवेळी पालन करणे बंधनकारक आहे.

20. आयोजक कोणत्याही सहभागीला अप्रमाणित करण्याचे किंवा सहभागास नकार देण्याचे सर्व हक्क राखून ठेवत आहेत जर त्यांना असे वाटले की कोणत्याही सहभागीचा सहभाग किंवा सहयोग क्विझ किंवा आयोजक किंवा क्विझच्या भागीदारांसाठी हानिकारक आहे. कोणतीही केलेली नोंदणी रद्दबातल ठरेल जर आयोजकांना प्राप्त झालेली माहिती बेकायदेशीर, अपूर्ण, नुकसान झालेली, खोटी किंवा त्रुटीपूर्ण असेल

21. MyGov कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांना या क्विझमध्ये भाग घेण्यास मनाई आहे.

22. क्विझबद्दल आयोजकांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल आणि त्यासंबंधी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही

23. क्विझमध्ये प्रवेश घेऊन, प्रवेशकर्ता वर नमुद केलेल्या या अटी आणि शर्ती बंधनकारक असल्याचे मान्य करत आहे आणि सहमत आहे

24. या अटी आणि शर्तींवर भारतीय न्यायालयीन कायद्यांद्वारे प्रशासन केले जाईल.

25. अनुवादित मजकुरासंदर्भात काही शंका असल्यास, यासंदर्भात contests@mygov.in यांना कळवण्यात यावे आणि हिंदी/इंग्रजी मजकुराचा संदर्भ घ्यावा.