तर पुन्हा एकदा सज्ज आहोत , सबका विकास महाकोडे या मालिकेतील दुसरी प्रश्नमंजुषा घेऊन, जी प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) या विषयावर आधारित आहे.
नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून MyGov India यांनी सबका विकास महाकोडे मालिका सुरू केली आहे. या प्रश्नावलींचा उद्देश म्हणजे सहभागी नागरिकांना भारत सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमांत बद्दल माहिती देणे व त्यांचा लाभ कसा मिळवावा हा आहे.
या संदर्भात, MyGov तुम्हा सर्वांना सहभागी होण्यासाठी तुम्हाला आमंत्रित करत आहे व तुमचे न्यू इंडियाबद्दलचे ज्ञान तपासण्याची संधी तुम्हाला देत आहे.या प्रश्नमंजुषेतील दुसरे कोडे आता प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) वर आहे.
आता थोडं प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) बद्दल
माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी न्यू इंडिया अंतर्गत प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर पक्के छत असावे हे सुनिश्चित करण्याचे स्पष्ट आवाहन केले आहे. त्यानुसार देशातील गरीब आणि उपेक्षित लोकांना पक्की घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. शहरी भागांसाठी प्रधानमंत्री आवास योजना अर्बन (शहरी) (PMAY-U) आणि ग्रामीण भागासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) या दोन वेगवेगळ्या योजनांद्वारे हे अभियान राबवले जात आहे.
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण भागातील कच्ची व मोडकळीस आलेल्या घरांमध्ये राहणार्या २.९५ कोटी ग्रामीण बेघर कुटुंबांना मुलभूत सुविधांसह २०२४ पर्यंत पक्के घर देण्याचे आहे. या योजनेअंतर्गत लोकांना त्यांचे घर बांधण्यासाठी रोख मदत दिली जाते.
जे नागरिक मैदानी भागात राहतात त्यांना १.२ लाख रुपये दिले जात आहेत; आणि १.३ लाख रुपये डोंगराळ राज्ये, अवघड क्षेत्रे आणि IAP जिल्हे (निवडक आदिवासी आणि मागास जिल्ह्यांसाठी एकात्मिक कृती योजना) येथील नागरिकांना दिले जात आहेत. याशिवाय, स्वच्छ भारत अभियान– ग्रामीणच्या मार्फत शौचालय बांधण्यासाठी १२००० रुपये देखील दिले जातात.
२८ एप्रिल २०२२ पर्यंत, २.३४ कोटी घरांना मंजुरी देण्यात आली आहे आणि १.७९ कोटी घरे पूर्ण झाली आहेत, अशाप्रकारे कोट्यावधी लोकांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे व त्यांच्या सामाजिक आर्थिक आणि मानसिक सुरक्षिततेची हमी दिली जात आहे.
PMAY-G (प्रधानमंत्री आवास योजना– ग्रामीण) चा लाभ कसा घ्यावा?
SECC(एस ई सी सी) डेटा आणि आवास + सर्वेक्षण व काही अटींनुसार जे घरहीन आहेत, शून्यात राहणारे, कच्ची भिंत आणि कच्चं छप्पर असलेले, एक किंवा दोन खोली (कच्ची घरे) असणाऱ्या अशा सर्व कुटुंबांचा समावेश हा PMAY-G अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या विश्वामध्ये होतो.सामाजिक–आर्थिक आणि जातिगणना (SECC 2011) यांसारख्या राष्ट्रीय, राज्य आणि ग्रामपंचायत स्तरावरील सर्वेक्षणांच्या मदतीने तयार केलेल्या यादीद्वारे त्यांची ओळख निश्चित केली जाते. ही यादी घर नसलेले खरे लाभार्थी ओळखते आणि या यादीतून वगळलेले लाभार्थी निवारणासाठी स्थानिक कार्यालयात दाद मागू शकतात.
यादी अंतिम झाल्यानंतर लाभार्थीच्या नावाने मंजुरी आदेश जारी केला जातो. लाभार्थीच्या नावे मंजुरीचा मुद्दा लाभार्थ्याला एसएमएसद्वारे देखील कळविला जाईल. लाभार्थी एकतर ब्लॉक ऑफिसमधून मंजुरी ऑर्डर गोळा करू शकतो किंवा त्याचा PMAY-G ID वापरून PMAY-G संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकतो. पहिला हप्ता लाभार्थीच्या नोंदणीकृत बँक खात्यावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मंजूरीचा आदेश जारी केल्यापासून एका आठवड्याच्या आत (७ कामकाजी दिवस) जमा केला जाईल.
कोणत्याही तक्रारीसाठी, मंत्रालय आणि राज्य संपर्क खात्यातील व्यक्तींशी संपर्क साधला जाऊ शकतो आणि त्यांचे तपशील https://pmayg.nic.in/netiay/contact.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. गुगल प्ले स्टोअरवर – आवास ॲप या नावाने एक मोबाइल ॲप उपलब्ध आहे व त्याच सोबत अधिक तपशिलांसाठी www.pmayg.nic.in हे पोर्टलही तयार करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना – अर्बन (शहरी)
जून २०१५ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना – अर्बन (शहरी) सुरू करण्यात आली होती . शहरी भागातील पात्र लाभार्थी कुटुंबांना ‘पक्के घर’ देण्याच्या दृष्टीने ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेची नांदी झाली. या अभियाना अंतर्गत, झोपडपट्टीतील रहिवासी आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग (EWS), निम्न उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम–उत्पन्न गट (MIG) श्रेणीतील इतर नागरिकांच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना केंद्रीय सहाय्य प्रदान करण्यात आले आहे.
ज्यांच्याकडे जमीन पट्टा आहे अशा लाभार्थ्यांना आर्थिक मदतीची सहाय्यता केली जाते आणि ज्यांच्याकडे जमीन नाही ते बांधलेल्या घरांसाठी पात्र ठरू शकतात. या योजनेचा तुम्हाला अनेक पद्धतीने लाभ होऊ शकतो जसे की स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी किंवा घर घेण्यासाठी आर्थिक सहाय्य, शौचालय, स्वयंपाकघर, पाणी आणि वीज पुरवठा यासारख्या मूलभूत सेवांची तरतूद आणि महिला सदस्यांच्या नावे किंवा महिलांना सक्षम करण्यासाठी संयुक्त नावाने मालकी.
सुमारे १.२ कोटी घरांना मंजुरी मिळाली आहे आणि मार्च २०२२ पर्यंत ५८ लाख घरे पूर्ण झाली आहेत.
PMAY-U चा लाभ कसा घ्यावा?
इच्छुक लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित क्षेत्रातील नागरी स्थानिक संस्थेशी संपर्क साधणे आवश्यक आहे. क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम (CLSS) या योजनेअंतर्गत लाभांसाठी, लाभार्थ्यांनी गृहकर्जावरील व्याज अनुदानाचा दावा करण्यासाठी थेट बँक/हाऊसिंग फायनान्स कंपनीकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
मदतीसाठी हे हेल्पलाइन क्रमांक ०११–२३०६३२८५ आणि ०११–२३०६०४८४ उपलब्ध करण्यात आले आहेत. भुवन अॅप, भारत एचएफए अॅप, जीएचटीसी इंडिया अॅप आणि पीएमएवाय (अर्बन) अॅप ही मोबाईल ॲप्स वापरात आहेत. यासोबतच https://pmay-urban.gov.in आणि https://pmaymis.gov.in अशी दोन पोर्टल्स देखील स्थापन करण्यात आली आहेत.
महाकोड्याची अनोखी वैशिष्ट्ये
MyGov चे साथी/वापरकर्ते त्यांच्या आवडीच्या कोणत्याही राज्याच्या आवृत्तीची निवड करून हा खेळ (महाकोडे) खेळू शकतात. प्रश्नमंजुषेतील कोडे आता प्रधानमंत्री आवास योजनेशी आणि त्या विशिष्ट राज्याशी संबंधित असतील. प्रश्नमंजुषा इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांसह अनेक भाषांमध्ये उपलब्ध असेल.
मग वाट कसली पाहताय..
सर्वांनी नक्की सहभाग घ्या…
खेळा, शिका व आकर्षक बक्षिसे जिंका.
1. ही क्विझ सबका विकास महाक्विझ मालिकेचा एक भाग आहे ज्यामध्ये विविध थीमवर वेगवेगळ्या क्विझेज सुरू केल्या जातील
2. हे कोडे 13 मे 2022 रोजी प्रारंभ केली जाईल आणि 27 मे 2022, रात्री ११:३० वाजेपर्यंत थेट प्रसारणामध्ये चालु राहील (IST)
3. सर्व भारतीय नागरिकांसाठी क्विझमध्ये प्रवेश खुला आहे.
4. हे कालमर्यादेत असलेले कोडे आहे ज्यामध्ये 100 सेकंदांमध्ये 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत
ही एक राज्य विशिष्ट क्विझ आहे जी एकाधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. एक व्यक्ती एकाधिक क्विझमध्ये भाग घेऊ शकते.
5. हे कोडे 12 भाषांमध्ये उपलब्ध असेल – इंग्लिश, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ आणि तेलगू
6. प्रत्येक क्विझमध्ये जास्तीत जास्त १,००० टॉप स्कोअरिंग सहभागींची विजेते म्हणून निवड केली जाईल. निवड झालेल्या प्रत्येक विजेत्याला 2,000/- रुपये दिले जातील.
7. विजेत्यांची निवड दिलेल्या अचूक उत्तरांच्या सर्वात जास्त संख्येच्या आधारावर केली जाईल. जर, अव्वल स्कोर करणाऱ्या सहभागींची संख्या 1,000 पेक्षा जास्त असेल तर उरलेल्या विजेत्यांची निवड कोडे पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेच्या आधारावर केली जाईल.
उदाहरण देऊन स्पष्ट करण्यासाठी, कोड्याचे निकाल खालीलप्रमाणे असल्यास –
8. एक सहभागी एका विशेष कोड्यामध्ये फक्त एकदाच जिंकण्यासाठी पात्र असेल. एकाच कोड्यादरम्यान एकाच प्रवेशकर्त्याकडून अनेक प्रवेश नोंदी त्यांना अनेकदा जिंकण्यासाठी पात्र ठरणार नाहीत. तथापि, सहभागी महाविकास क्विझ मालिकेच्या वेगळ्या कोड्यामध्ये जिंकण्यासाठी पात्र आहे
9. तुम्ही तुमचे नांव, इमेल पत्ता, टेलिफोन नंबर आणि पोस्टाचा पत्ता देणे आवश्यक असेल. तुमचे संपर्क तपशील देऊन, कोड्याच्या उद्देशासाठी आणि जाहिरात सामग्री मिळवण्यासाठी वापरल्या जाणार्या या तपशीलांना तुम्ही संमती द्याल.
10. बक्षीसाच्या पैशांचे वितरण करण्यासाठी घोषित केलेल्या विजेत्यांनी त्यांचे बँक तपशील देणे आवश्यक असेल. बक्षीसाच्या पैशांचे वितरण केले जाण्यासाठी वापरकर्त्याचे नांव बँक खात्यावरील नांवासह जुळत असले पाहिजे.
11. प्रश्न स्वयंचलित प्रक्रियेद्वारे प्रश्न बँकेतून यादृच्छिकपणे निवडले जातील
12. तुम्ही एखादा अवघड प्रश्न सोडून देऊ शकता आणि नंतर काही काळाने त्या प्रश्नावर पुन्हा येऊ शकता.
13. यामध्ये कोणतेही नकारात्मक गुण नसतील.
14. कोडे त्या वेळेस ताबडतोब सुरू होईल जेव्हा सहभागी स्टार्ट क्विझ बटनावर क्लिक करेल
15. एकदा प्रवेश घेतल्यावर तो काढून घेतला जाऊ शकत नाही
16. जर असे उघडकीस आले की अवाजवी वेळेत कोडे पूर्ण करण्यासाठी सहभागीने अनुचित मार्गाचा वापरला आहे, तर प्रवेश नाकारला जाऊ शकतो
17. आयोजक अशा प्रवेशांसाठी कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नाहीत जे हरवले आहेत, उशीरा मिळाले आहेत किंवा अपूर्ण आहेत किंवा कॉम्प्युटरमधील त्रुटीमुळे किंवा आयोजकाच्या वाजवी नियंत्रणाबाहेरील कोणत्याही इतर त्रुटीमुळे प्रसारित झालेले नाहीत. कृपया लक्षात घ्या की प्रवेश दाखल करण्याचा पुरावा म्हणजे प्रवेश प्राप्त झाल्याचा पुरावा नाही.
18. कोणत्याही अनपेक्षित परिस्थिती उदभवल्याच्या बाबतीत, आयोजक क्विझमध्ये कोणत्याही वेळी सुधारणा करण्याचा किंवा क्विझ मागे घेण्याचा हक्क राखून ठेवत आहेत. यामध्ये कोणतीही शंका टाळण्यासाठी या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्याचा हक्क समाविष्ट आहे
19. सहभागींना क्विझमध्ये सहभाग घेण्याचे सर्व नियम आणि नियमनांचे वेळोवेळी पालन करणे बंधनकारक आहे.
20. आयोजक कोणत्याही सहभागीला अप्रमाणित करण्याचे किंवा सहभागास नकार देण्याचे सर्व हक्क राखून ठेवत आहेत जर त्यांना असे वाटले की कोणत्याही सहभागीचा सहभाग किंवा सहयोग क्विझ किंवा आयोजक किंवा क्विझच्या भागीदारांसाठी हानिकारक आहे. कोणतीही केलेली नोंदणी रद्दबातल ठरेल जर आयोजकांना प्राप्त झालेली माहिती बेकायदेशीर, अपूर्ण, नुकसान झालेली, खोटी किंवा त्रुटीपूर्ण असेल
21. MyGov कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांना या क्विझमध्ये भाग घेण्यास मनाई आहे.
22. क्विझबद्दल आयोजकांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल आणि त्यासंबंधी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही
23. क्विझमध्ये प्रवेश घेऊन, प्रवेशकर्ता वर नमुद केलेल्या या अटी आणि शर्ती बंधनकारक असल्याचे मान्य करत आहे आणि सहमत आहे
24. या अटी आणि शर्तींवर भारतीय न्यायालयीन कायद्यांद्वारे प्रशासन केले जाईल.
25. अनुवादित मजकुरासंदर्भात काही शंका असल्यास, यासंदर्भात contests@mygov.in यांना कळवण्यात यावे आणि हिंदी/इंग्रजी मजकुराचा संदर्भ घ्यावा.